पंजाब नॅशनल बँकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला पुण्याच्या कर्ज वसुली न्यायाधीकरणाने (डीआरटी) जोरदार दणका दिला आहे. पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी पीएनबी बँकेला ७३०० कोटी रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश न्यायाधीकरणाने मोदीला दिले आहेत. नीरव मोदी प्रकरणातील हा भारतातला पहिलाच निकाल आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या फसवणूक प्रकरणी पुण्यात नीरव मोदी विरोधात दोन खटले सुरू आहेत. पीठासीन अधिकारी दीपक ठक्कर यांच्या समोर हा खटला सुरू असून न्यायाधीकरणाने मोदीवर ताशेरे ओढत त्याला बँकेचे ७३०० कोटी रुपये व्याजासह परत देण्याचे आदेश दिले आहेत.
