दोन दशकांहून अधिक काळ पडसलगीकर यांनी गुप्तहेर खात्यात कर्तव्य बजावताना अनेक किचकट मोहिमा हाताळल्या.
राज्याचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती झाल्याचे वृत्त आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी पडसलगीकर हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना सहाय्य करतील.
दोन दशकांहून अधिक काळ पडसलगीकर यांनी गुप्तहेर खात्यात कर्तव्य बजावताना अनेक किचकट मोहिमा हाताळल्या. दहशतवाद, दहशतवादी संघटनांबाबत त्यांचा अभ्यास दांडगा आहे. अंतर्गत सुरक्षेसाठी उपाययोजना करताना त्यांच्यासारख्या अनुभवी, कर्तव्य कठोर, प्रामाणिक अधिकाऱ्याचा डोभाल यांना निश्चित फायदा होऊ शकेल.
दत्ता पडसलगीकर हे मुंबईचे पोलीस आयुक्त असताना पोलीस दलाचा कारभार गतीमान करण्याबरोबरच शहर सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक अभिनव उपक्रम राबवले होते.
