गणपतीपुळे येथील समुद्रात आज सकाळी दोन तरुणींसह तिघे जण बुडाले. हे तिघेही कोल्हापूरहून पर्यटनासाठी आले होते. दोघींचे मृतदेह सापडले असून, बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यात येत आहे.
कोल्हापुरातील कसबा बावडा येथील तिघे जण पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आले होते. आज सकाळी ते समुद्रात पोहण्यासाठी उतरले असता, पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. काजल जयसिंग मचले (वय १८), सुमन विशाल मचले (वय २३) आणि राहुल अशोक बागडे (वय २७) अशी मृतांची नावे आहेत. त्यातील सुमन आणि काजलचा मृतदेह सापडला असून, राहुल बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे.
