बांगलादेशसह तीन सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने कुशल पेरेरेराच्या शानदार शतकामुळे 31१4 धावांची नोंद केली.
लसिथ मलिंगाचा अंतिम वनडे सामना असल्याने या सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त होते.
कुशल परेराची ९९ चेंडूंत १११ धावांची खेळी तसेच त्याला कुशल मेंडिस (४३) आणि अँजेलो मॅथ्यूज (४८) यांनी साथ दिल्यामुळे श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद 314 धावा केल्या. हे उद्दिष्ट गाठताना मुशफिकुर रहीम (६७) आणि शब्बीर रेहमान (६०) यांचा प्रतिकार वगळता बांगलादेशच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही.
त्यामुळे बांगलादेशचा डाव २२३ धावांवर संपुष्टात आला. मलिंगानेही तीन मोहरे टिपत सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत भारताचा लेगस्पिनर अनिल कुंबळेला मागे टाकले.
