कर्नाटकमधील कुमारस्वामी यांचे सरकार पडल्यानंतर आज तीन दिवसांनी कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला.
नव्या सरकारचा शपथग्रहण सोहळा आजच घेण्यात यावा अशी विनंती येडियुरप्पा यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांना केली.
राज्यपाल वाला यांनी येडियुरप्पांचा प्रस्ताव मंजूर केला असून आजच नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथग्रहण सोहळा होणार आहे.
दरम्यान, येडियुरप्पा हेच कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील अशी माहिती पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी दिलीय.
येडियुरप्पा आज संध्याकाळी ६ वाजता शपथ घेतील.
