बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरचा ‘कबीर सिंह’ हा चित्रपट काल प्रदर्शित झाला. देशभरातून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटानं २० कोटी रुपयांचा गल्ला जमवल्याचं समजतंय.
चित्रपट कबीर सिंह हे तेलुगू चित्रपट अर्जुन रेड्डीची रीमेक आहे, हा चित्रपट आंध्र प्रदेशमध्ये खूप यशस्वी झाला. व्यापार विश्लेषक म्हणत आहेत की आगामी आठवड्यात चित्रपटाने चांगला व्यवसाय शक्तो.
पहिल्याच दिवशी एवढी कमाई करणारा शाहिद कपूरचा हा बहुधा पहिलाच चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या व शाहीदची भूमिका असलेल्या ‘पद्मावत’नं पहिल्या दिवशी १८.२१ कोटींची कमाई केली होती.
