आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेन ठार झाल्याचं वृत्त आहे. अमेरिकेच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, हमजाच्या मृत्यूमागे अमेरिकेचा हात आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
हमजाचा मृत्यू नेमका कुठे झाला तेही अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं नाही. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. दरम्यान, हमजाचा ठावठिकाणा सांगणाऱ्या व्यक्तीला १० लाख डॉलर्सचं इनाम अमेरिकेने जाहीर केलं होतं. हमजा आपल्या पित्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अमेरिकेवर हल्ला करण्याचा कट रचत असल्याचं अमेरिकेचं म्हणणं होतं.
