कॅन्सरसारख्या आजारावर उपचार घेण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये गेलेले बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांच्या तब्येतीत सुधारणा होत असून त्यांचा ६७वा वाढदिवस ते भारतात साजरा करू शकतात.
येत्या ४ सप्टेंबर ऋषी कपूर यांचा ६७वा वाढदिवस आहे. हा वाढदिवस त्यांना मायदेशी कुटुंबीय आणि मित्र परिवारासोबत साजरा करायची इच्छा आहे. परंतू डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच ते निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. ‘मी भारतात येईल तेव्हा १००% बरा झालेला असेन असंही ऋषी कपूर यांनी सांगितलं.
२०१८ सालच्या सप्टेंबर महिन्यात न्यूयॉर्कला गेलेले ऋषी कपूर उपचार संपवून भारतात केव्हा पतरणार, याची चर्चा बॉलिवूडमध्ये चांगलीच जोर धरून होती. गेल्या महिन्यातच त्यांचा मुलगा, अभिनेता रणवीर कपूर, याने ‘त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. ते दोन महिन्यात परत येतील’, असं ट्विट केल्याने लवकरच ऋषी कपूर परत येतील, असा कयास बांधला जात होता. आता उपचार संपवून तब्बल एका वर्षाने म्हणजेच येत्या सप्टेंबर महिन्यात, ऋषी कपूर भारतात परत येणार आहेत. ते परतण्याची बातमी त्यांच्या चाहत्यांना नक्कीच दिलासा देणारी ठरेल.
