अनुसुचित जाती आणि जमाती यांच्या सुरक्षेसाठी अत्याचार प्रतिबंधक कायदा, १९८९ करण्यात आला आहे. कारण गेल्या काही वर्षांत जातीभेद या विषयावर देशात खूप खळबळ माजली आहे. आता हेच पहा आयआयटी बाँम्बे संस्थानाच्या दलित विद्यार्थ्यांसोबत हीन वागणूक व मारहाण करण्यात आली. जातीभेद या विषयावर अनुपम कुमार या माहितीपट चित्रपट निर्मात्याने चित्रपट बनवून “आयआयटी मधील जातींवर अत्याचार हा थेट नसून पद्धतशीरपणे केला आहे”. असे त्यात सांगितले आहे.
अनेकांनी जाताभेदामुळे आत्महत्या केल्या. त्या आत्महत्येंच्या परिणाम स्वरूप नुकत्याच मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अहवाला/माहितीनुसार गेल्या २ वर्षात जवळपास २,४०० विद्यार्थ्यांनी आय आय टी बाँम्बे संस्थानाला रामराम ठोकला आहे.
आय आय टी बाँम्बेचे प्राध्यापक तपनदेव कुंडूस यांचा दलित विद्यार्थ्यांना प्रताडीत करण्यामागे हात आहे. असा संशय व्यक्त केला जात आहे. दलित सकारात्मक चळवळ संस्था, मानवसंसाधन विकास मंत्रालय तर्फे प्राध्यापक तपनदेव कुंडूस यांच्यावर अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, १९८९ अंतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीदरम्यान जर प्राध्यापक तपनदेव कुंडूस दोषी असल्याचे सिद्ध झाले तर त्यांच्या विरोधात कार्यवाही करण्याची मागणी आहे.
