देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बोबडे यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. १७ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झालेले सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या जागी त्यांची निवड करण्यात आली आहे.
शरद बोबडे हे ज्येष्ठ वकील अरविंद बोबडे यांचे सुपुत्र आहेत. सरन्यायाधीशपदी त्यांची निवड सेवाज्येष्ठतेनुसार झाली आहे. न्यायमूर्ती शरद बोबडे यांची कारकीर्द १७ महिन्यांची असेल आणि ते सरन्यायाधीश पदावरून २३ एप्रिल २०२१ या दिवशी निवृत्त होतीलअयोध्या निकालप्रक्रियेमध्ये न्यायमूर्ती शरद बोबडे यांची महत्त्वाची भूमिका होती. ६३ वर्षीय बोबडे यांनी कोलोजियम प्रकरणी सावध पवित्रा घेण्याचे ठरवले आहे. वृत्तसंस्थेला दिलेल्या ताज्या मुलाखतीत बोबडे यांनी सांगितले की, नागरिकांचा सन्मान हा अत्यंत महत्त्वाचा आहे. देशात न्यायाधीशांच्या अनेक जागा रिक्त आहेत, तसेच न्यायिक पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. यासंदर्भात विचारले असता, बोबडे यांनी तर्कावर आधारित भूमिका घेण्याचे तसेच त्यांचे पूर्वसुरी रंजन गोगोई यांच्या निर्णयांचा आदर करण्याचे सूतोवाच केले आहे.
