कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पाकिस्तानात जाणार नाही असे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सुद्धा पाकिस्तानला जातील असे आपल्याला वाटत नाही असे अमरिंदर सिंग म्हणाले. कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देणाऱ्या सर्व पक्षीय शिष्टमंडळात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सहभागी होणार आहेत.
९ नोव्हेंबरला पाकिस्तानात कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन होणार आहे. त्या कार्यक्रमाला शिष्टमंडळ जाणार नसल्याचे अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केले. कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आपण पाकिस्तानात जाणार नाही तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सुद्धा पाकिस्तानला जातील असे आपल्याला वाटत नाही असे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केले आहे.
अमरिंदर सिंग यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरू नानक देव यांच्या ५५० व्या जयंती कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे.
अमरींदर सिंग यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना डेरा बाबा नानक येथे कर्तारपूर कॉरिडॉर आणि १२ नोव्हेंबरला सुल्तानपूर लोधी येथे होणाऱ्या कार्यक्रमातही सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. पाकिस्तानातील कर्तारपूरचे दरबार साहिब व गुरूदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक ही दोन शीख धर्मस्थळे जोडण्यात येत आहेत. कॉरिडॉर मार्गे पाकिस्तानातील दरबार साहिब येथे दररोज ५ हजार शीख भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे.
