चीनला टक्कर देण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी भारताने जोरदार तयारी सुरू केली आहे. भारताने मार्च महिन्यात अॅन्टी सॅटेलाइट (A-Sat) क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. भारत आता पुढील महिन्यात पहिल्यांदाच अंतराळात युद्धाभ्यास करणार असून या योजनेला ‘IndSpaceEx’ असे नावही देण्यात आले आहे.
अंतराळाचे सैन्यकरण होत आहे. जुलै महिन्यात अखेरच्या आठवड्यात होणाऱ्या अभ्यासाचा मुख्य उद्देश म्हणजे आपली राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणे होय. तचेस अंतराळात काउंटर स्पेच क्षमतेचे मोजमाप करणे हे होय, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पुढील महिन्यात अंतराळात युद्धाभ्यास केल्यानंतर आपल्या सशस्त्र दलाची विश्वासार्हता वाढेल तसेच राष्ट्रीय सुरक्षा मजबूत होईल. ‘IndSpaceEx’ मुळे अंतराळातील आव्हाने समजून घेण्यात मदत मिळेल, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.
चीनने जानेवारी २००७ मध्ये हवामान उपग्रहाविरुद्ध A-Sat क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. अंतराळातील अमेरिकेचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी चीनने त्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला (समुद्रात एका जहाजावरून ७ सॅटेलाइट लाँच) तीन दिवसापूर्वीच लाँच केले आहे. भारत सध्या अन्य काउंटर-स्पेस क्षमतेला विकसीत करण्यासाठी काम करीत आहे. वीज शस्त्र (DEWS), लेजर, ईएमपी यासारख्या इलेक्ट्रॉनिक हल्ल्यातून आपल्या उपग्रहाचे संरक्षण करता येऊ शकते, अशी माहिती डीआरडीओचे प्रमुख सतेश रेड्डी यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना दिली.
